मान्सून समाचारअॅग्रोवन
राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे – अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात असलेल्या कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडयात मेघगर्जना, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातही तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोकणात आज अति जोरदार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडयात जोरदार पावसाचा अंदाज आहे. कोकण किनाऱ्यालगत ताशी ४५ ते ५५ किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. संदर्भ – अॅग्रोवन, २३ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
0
संबंधित लेख