मान्सून समाचारअॅग्रोवन
राज्यात ‘या’ ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज
पुणे – मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकल्याने राज्यात पावसाला सुरूवात झाली. बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे आज या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही स्थिती पूरक ठरल्याने राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर मराठवाडयातही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 2 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
39
0
संबंधित लेख