AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Nov 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकामध्ये फेरोमोन सापळे बसविताना 'ही' काळजी घ्यावी
पिकाचे नुकसान होण्यास कारणीभूत असणाऱ्या किडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी शेतकरी वारंवार कीटकनाशकांचा अवलंब करत असतो. काही घटनांमध्ये कीटकनाशकांचा अधिकतम झालेला वापर हा पर्यावरणाला होणाऱ्या नुकसानास कारणीभूत ठरतो आणि त्यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. कित्येक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले आहेत व त्यांना उत्पादन निर्यात करण्याची एक उत्तम संधी मिळाली आहे. फेरोमोन सापळ्यांचा वापर केवळ सेंद्रिय शेतीसाठीच नाही, तर पिकाच्या नियमित लागवडीसाठीही अत्यंत महत्वाचा आहे. फेरोमोन सापळे एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) चा आधार आहे. सामान्यत: कीड नियंत्रण आणि होणाऱ्या प्रादुर्भावाचे निरीक्षण करण्यासाठी वापरले जातात.
याबाबत अधिक जाणून घेऊया: • सापळ्याला विशिष्ठ प्रकारचा वास असतो. त्यामुळे नर किडी फेरोमोन सापळ्याकडे आकर्षित होतात आणि मरून जातात. परिणामी नर पतंगांची संख्या कमी होत जाते आणि मादी अंडी घालतात जे अबाधित असतात, अशा अंड्यांमधून अळी उबत नाही त्यामुळे पिकावरील प्रादुर्भाव कमी होऊन पिकाचे संरक्षण होते. • या प्रकारचे फेरोमोन सापळे फळ माशीसारख्या अनेक किडींसाठी उपलब्ध आहेत. अमेरिकन बोंड अळी, ठिपक्यांची बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, कोबी पतंग, खोड अळी, एरंड उंटअळी, नागअळी, वांग्यामधील शेंडा आणि फळ पोखरणारी अळी, नारळ- लाल पाम भुंगा, हुमणी इ. • फेरोमोन सापळे विशिष्ट प्रकारचे असल्याने यातील केमिकलच्या वासामध्ये केवळ नर पतंग आकर्षित होतात. • एकाच सापळ्यात वेगवेगळ्या किडींच्या आकर्षणाचे ल्युर (गोळ्या) लावू नये. आवश्यक असल्यास वेगवेगळे सापळे बसवावेत. • हे सापळे पिकाच्या उंचीपासून साधारणतः अर्धा ते एक फूट अंतरावर वरच्या बाजूस बसवावेत. पिकाची जशी उंची वाढेल, त्यायोगे वेळोवेळी सापळ्यांची उंची देखील वाढवावी. • शेतीमध्ये दोन सापळ्यां दरम्यान सुमारे १० मीटर अंतर ठेवावे. • पिकाची उगवण झाल्यानंतर सापळे बसवून घ्यावेत, त्यानंतर पिकाच्या वाढीनुसार त्याचे नियोजन करावे. • एकदा सापळे बसविल्यानंतर त्यांची जागा वारंवार बदलू नये. • कोणत्याही परिस्थितीत सापळ्यांवर कीटकनाशकाची फवारणी करू नये. • महिन्यातून एकदा तरी ल्युर बदलावी. • खरेदी केलेल्या ल्युर्स थंड ठिकाणी ठेवल्या पाहिजेत. पॅकेट्स तोडताच त्यांचा वापर करावा. • सर्वसाधारणपणे सर्वेक्षण किंवा निरीक्षण करण्यासाठी पाच सापळे लागतात तर किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टर २५ ते ४० सापळे लागतात. • सर्वेक्षण किंवा निरीक्षण करण्यासाठी बसविलेल्या सापळ्यात ५ ते ७ दिवसांत ५ किंवा त्यापेक्षा जास्त पतंग सतत अडकल्यास किडीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करावी. • सापळ्यात अडकलेले पतंग आठवड्यातून दोनदा गोळा करून नष्ट करावे. • कुत्रे किंवा जनावरांपासून सापळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. • एकाच भागातील सर्व शेतकरी एकसारख्या प्रकारचे सापळे बसवत असल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला आणि जलद होतो. • चांगल्या गुणवत्तेचे सापळे मिळविण्यासाठी नामांकित उत्पादकांकडून सापळे खरेदी करावे. • झाडावर सापळे न लावता ते लाकडी किंवा लोखंडी दांड्यावर बांधावेत. • जर लाकडी दांड्यांचा वापर केला गेला असेल, तर वाळवीच्या नुकसानीपासूनची काळजी घ्या. संदर्भ: अॅगोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर, फोटोखाली दिलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा!
123
5