कृषी वार्तालोकमत
एक लाख टनांहून अधिक द्राक्षांची निर्यात
नाशिक: यंदा द्राक्ष निर्यातीत २५ ते ३० टक्कयांनी वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून जवळपास आठ हजार चारशे कंटेनरच्या माध्यमातून सुमारे १ लाख टनांहून अधिक द्राक्षांची युरोप व इंग्लडच्या बाजारपेठेत निर्यात झाली आहे. रशियातत सुमारे एक हजार कंटेनर द्राक्षंची निर्यात झाली असून श्रीलंका, बांगलादेश, मध्यपूर्व आशियात मोठ्या प्रमाणात द्राक्षांची निर्यात सुरु आहे. एप्रिल अखेरपर्यंत निर्यातीचा आकडा दोन लाख टनाचा टप्पा पार करण्याची शक्यता द्राक्ष बागायतदार संघाकडून व्यक्त होत आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा द्राक्ष निर्यातीत २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून गतवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारतातून ८८ हजार २०२ टन द्राक्षे युरोपीय बाजारपेठेत निर्यात झाली आहे. यंदा त्यात वाढ होऊन आतापर्यंत तब्बल एक ते सव्वा लाख टन द्राक्ष निर्यात झाली आहे. काही दिवसांपूर्वी ४० ते ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचलेले द्राक्षांचे दर आता ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. युरोपसह जगातील इतरही देशांत भारतीय द्राक्षांना मागणी असून भारतातून ८ हजार चारशे कंटेनरमधून निर्यात झाली आहे. त्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे ४८०८ कंटेनर निर्यात नेदरलँड मध्ये झाली असून त्या खालोखाल युरोपातील आघाडीवर असलेले जर्मनीत १४३३, इंग्लंड मध्ये १३१७, डेन्मार्क मध्ये १७३ व फिनलँड मध्ये १२४ कंटेनर निर्यात झाली आहे. _x005F_x000D_ संदर्भ – लोकमत, ९ एप्रिल २०१९_x005F_x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख