कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
धान्याचे उत्पादन २८.१३ कोटी टन होण्याचा अंदाज
देशभरात सामान्यत: ९ टक्के पाऊस कमी प्रमाणात होऊन ही, अधिक उत्पादनाचा अंदाज नवी दिल्ली: खरीफ हंगामात देशभरात सामान्यपणे ९ टक्के पाऊस कमी प्रमाणात झाल्याने, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा व बिहार या राज्यातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. दुष्काळस्थिती असताना ही चालू पेरणी हंगामात २०१८-१९ मध्ये देशात धान्याचे उत्पादन २८.१३ करोड़ टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे मागील वर्षी २०१७-१८ मध्ये २७.७४ करोड़ टन धान्याचे उत्पादन झाले होते.
कृषि मंत्रालय द्वारा सांगण्यात आलेल्या दुसऱ्या अग्रिमच्या अंदाजे, पीक उत्पादन २०१८-१९ मध्ये देशात भात ११.५६ करोड़ टन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी पीक हंगाम २०१७-१८ मध्ये दुसरा अंदाज ११.१० करोड़ टनने जास्त आहे. गहू उत्पादन देखील चालू रब्बी हंगामात ९९१ लाख टन होण्याच अंदाज आहे. जे मागील वर्षी गहू ९७१ लाख टन उत्पादन झाले होते. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २८ फेब्रुवारी २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0
संबंधित लेख