AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Apr 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
निर्यातधारांसाठी नवीन योजना नियम निश्चित
अलीकडेच वाणिज्य मंत्रालयाने ट्रान्सपोर्ट आणि मार्केटिंग सहाय्य (टीएमए) योजने अंतर्गत एक वाहतूक आणि विपणन सहाय्य योजना जाहीर केली आहे. या योजनेमागचा हेतू युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांमध्ये कृषी वस्तूंच्या निर्यातीस प्रोत्साहन देणे व शेती उत्पादनांच्या वाहतूक आणि विपणनसाठी आर्थिक सहाय्य सुलभ होणे हा आहे.
या योजनेअंतर्गत, मालवाहतुकीचा एक निश्चित हिस्सा सरकारकडून परतफेड केला जाईल आणि शेती उत्पादनांच्या विपणनासाठी शेतकऱ्यांना सहाय्य दिले जाईल. त्याचबरोबर विदेशी व्यापार निदेशालय (डीजीएफटी) ने निर्दिष्ट कृषी उत्पादनांसाठी टीएमए मिळविण्यासाठी प्रक्रिया आणि आयात-निर्यात फॉर्म जारी केला आहे. या योजनेमध्ये हवाई आणि समुद्राच्या दोन्ही मार्गांनी (सामान्य आणि रेफ्रिजेरेटेड कार्गो दोन्ही) निर्यातीसाठी फ्रेट आणि मार्केटिंग समर्थन समाविष्ट आहे. या प्रक्रियेनुसार, एक नोंदणीकृत आणि पात्र निर्यातक ज्याला निर्यात प्रमोशन कौन्सिल किंवा कमोडिटी बोर्डद्वारे जारी केलेले वैध नोंदणी सह सदस्यता प्रमाणपत्र आहे, सहाय्य / हक्कांसाठी ऑनलाइन ही अर्ज करू शकतात. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
7
0