कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
केंद्र सरकार दुधाचे किमान समर्थन मुल्य निश्चित करणार नाही
नवी दिल्ली – केंद्र सरकार दुधाचे किमान समर्थन मुल्य (एमएसपी) निश्चित करणार नसल्याची माहिती पशुपालन व डेयरी राज्य मंत्री डॉ. संजीव कुमार बालियान यांनी राज्यसभेत एका प्रश्नांचे लिखितमध्ये उत्तर दिले. बालियान म्हणाले, दूध हा पदार्थ लवकर खराब होणारा आहे, यासाठी डेयरी विभागचे देशात दूधसाठी एमएसपी निर्धारित करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्याचबरोबर डेयरी विभाग देशामध्ये दुधाच्या किंमतीवर नियंत्रित करत नाही. उत्पादनावर आधारित दुधाच्या किंमती या काही डेयरी निश्चित करतात.
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, एवढया काही वर्षातच दुधाचे उत्पादन वाढले आहे. त्याचबरोबर भारत हा देश दुध उत्पादनात अग्रगण्य आहे. वर्ष २०१३-१४ मध्ये दुधाचे वार्षिक उत्पादन १३.७६ करोड टन होते. जे २०१७-१८ मध्ये वाढ होऊन १७.६३ करोड टन झाले आहे. संदर्भ – इकोनॉमिक टाइम्स, २८ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
19
0
संबंधित लेख