कृषी वार्तालोकमत
सरकार देणार प्रति एकर चार हजार, शेती कर्ज होणार व्याजमुक्त?
नवी दिल्ली  - शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रत्येक हंगामात एकरी चार हजार रुपये मदत आणि एक लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज देण्याची तयारी सरकार करत आहे. या संदर्भातील घोषणा आठवडाभरात होण्याची शक्यता आहे. आपल्या या निर्णयाला अंतिम रूप देण्यासाठी पीएमओ आणि नीती आयोगामध्ये त्वरित बैठका बोलावण्यात आल्या आहेत, तसेच यासंदर्भात विविध मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांना अनौपचारिक बैठका घेण्य़ास सांगण्यात आले आहे याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: शेतकऱ्यांची चर्चा करणार आहेत त्यामुळे या निर्णयाबाबतची घोषणा याच आठवड्यात होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेती हंगामापूर्वी प्रति एकर चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील, तसेच व्याजमुक्त शेती कर्जाची मर्यादा पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरवरून वाढवून एक लाख रुपये प्रति हेक्टर एवढी करण्यात येईल. आतापर्यंत टक्के दराने शेतकऱ्यांना शेती कर्ज मिळत होते, मात्र आता बँका एक लाख रुपयांपर्यंतच्या शेती कर्जावर व्याज आकारणार नाहीत. संदर्भ – लोकमत, ३ जानेवारी २०१८
17
0
संबंधित लेख