AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
22 Oct 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
आता, शासन उपग्रहाच्या माध्यामातून करणार पिकांच्या नुकसानीचे आकलन
मुसळधार पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. हो, कारण पीक नुकसानीबाबत समस्येचे निराकरण करण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेत एक मोठे पाऊल उचलले आहे.
आता पिकांचे किती नुकसान झाले आहे याचा अचूक अंदाज घेण्यासाठी सरकार उपग्रहाची मदत घेणार आहे. शासनाचे हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत अचूक व योग्य माहिती शासनाला मिळेल व त्यानुसार शेतकऱ्याला होणाऱ्या नुकसानीबाबत योग्य अशी भरपाई मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, स्मार्ट सॅम्पलिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लवकरच त्याचा मोबदला मिळावा याची खातरजमादेखील शासन करणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे पाऊस, वादळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संदर्भ : कृषी जागरण, १९ ऑक्टोबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
131
0