AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Jan 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतकऱ्यांच्या फायदयासाठी सरकारने उचलेले पाऊल
सरकार ने अन्नधान्य उत्पादनांच्या बहुतेक क्षेत्राशी लवकर खराब होणाऱ्या खादय वस्तूंना खरेदी करण्यासाठी अथवा अधिक मागणी असणाऱ्या क्षेत्रात विक्रीसाठी नेफेडसोबत जोडले असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगले मुल्य मिळेल हे निश्चित असल्याचे मत खादय प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी व्यक्त केले. केंद्रीय खादय व पेय पदार्थ व्यापार कार्यक्रमात 'इंडस फूड' च्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटनावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, या गोष्टी शक्य व्हावे यासाठी पहिल्यांदा नेफेड सारख्या संघटनांसोबत काम करत आहोत. हा निर्णय नक्कीच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.
नेफेड एक प्रमुख कृषि-सहकारी संस्था आहे. जी शासनाच्यावतीने डाळ व तेलबियांच्या खरेदीचे कार्य करते. बादल म्हणाले की, दररोज आम्ही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र सारख्या राज्यांमधून शेतकऱ्यांच्या माध्यमातून कृषी पदार्थ वाया जाणे किंवा कमी पैशांत विकणे यासारख्या बातम्या वाचतो, मात्र लवकरच ही परिस्थिती बदलेल असे वाटते. केंद्र सरकारने हे सुरूवातीपासूनच सुनिश्चित करण्यासाठी तंत्र विकसीत करण्याचे काम सुरू केले आहे. कोणत्याही वस्तूंचे अधिक उत्पादन करणारे राज्य हे मागणी असलेल्या दुसऱ्या राज्यात ही आपल्या वस्तू घेऊन जाऊ विक्री करू शकतात. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १५ जानेवारी २०१९
7
0