कृषी वार्ताकृषी जागरण
आता, हवामानापूर्वीची माहिती फेसबुक, ट्विटरवर
सतत बदलत राहणाऱ्या हवामानामुळे पिकांचे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने 'पायलट प्रकल्प' च्या अंतर्गत 'ग्रामीण कृषी हवामान सेवा' योजनेची सुरूवात केली आहे. यासाठी पृथ्वी प्रणाली विज्ञान संस्था (ईएसएसओ) आणि भारतीय हवामान विभाग (आयएमडी) च्या ग्रामीण कृषी हवामान सेवा व (जीकेएमएस) कृषी विज्ञान केंद्राद्वारे आता, फेसबुक आणि ट्विटरवर हवामान पूर्वीची माहिती मिळणार आहे.
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून याचे क्षेत्र आणखी वाढविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करणार आहे. ज्यामुळे जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचा अंदाज पोहचवू शकतो. नोव्हेंबर २०१८ मध्ये 'कृषी विज्ञान केंद्र' ने ग्रामीण कृषी हवामान सेवा योजना सुरू केली होती. संदर्भ - कृषी जागरण, ४ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
272
0
संबंधित लेख