कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासन देणार साखर कारखान्यांना पुन्हा एकदा अनुदान!
केंद्र सरकार ऊस पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सुधारणा व्हावी यासाठी साखर कारखान्यांना पुन्हा एकदा अनुदान देण्याची शक्यता आहे. सूत्रानुसार, साखर कारखान्यांना जवळजवळ १० हजार कोटी रु. चे कर्ज दिले जाऊ शकते याशिवाय साखरेची किमान विक्री भाव देखील वाढविण्याची तयारी करण्यात आली आहे. खादय मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकारीनुसार, केंद्र सरकार पाच वर्षापर्यत ६ टक्के व्याजवर साखर कारखान्यांना कर्ज देणार आहे. हे कर्ज साखर कारखान्यांना इथेनाॅल उत्पादनची क्षमता
वाढविण्याबरोबरच नवीन इथेनाॅल प्लांट लावण्यासाठीदेखील दिला जाईल, याशिवाय केंद्र सरकार किमान विक्री भावदेखील २९ रू. वाढवून ३२ रू. प्रति किग्रॅ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुत्रांच्या म्हणण्यानुसार, आगामी कॅबिनेटची बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे. संदर्भ– आउटलुक अॅग्रीकल्चर, ०८ जानेवारी २०१९
2
0
संबंधित लेख