AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Aug 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
‘या’ योजनेअंतर्गत १० करोड शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य
शासनाचे या वर्षी पीएम- किसान योजनेच्या अंतर्गत १० करोड शेतकऱ्यांना जोडण्याचे लक्ष्य आहे. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितले की, ५.८८ करोड शेतकऱ्यांना पहिली तथा ३.४० करोड शेतकऱ्यांना दुसरा हप्ता जमा झाला आहे. या योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन हप्त्याप्रमाणे सालाना ६,००० रू. दिले जाणार आहे. कृषी मंत्री यांनी सांगितले की, प्रधानमंत्री शेतकरी सम्मान निधि (पीएम-किसान) योजनेमध्ये पश्चिम बंगाल सोडून इतर सर्व राज्य सहभागी होत आहे. दिल्ली राज्याने शेतकऱ्यांना यादी पाठविणे सुरू केले आहे. त्याचबरोबर वर्षाअखेरपर्यंत १० करोड शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ९ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
105
0