कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासनाने गहू व्यापऱ्यांची मागविली माहिती
केंद्र सरकारची मोठया व्यापाऱ्यांवर करडी नजर आहे, या अंतर्गत, शासनाने भारतीय खाद्य निगम (एफसीआय) च्या माध्यमातून गहू व्यापऱ्यांची माहिती मागवली. एफसीआय ओएमएसएसच्या अंतर्गत गहूची विक्री १.९५० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र तंज्ञानुसार, ही किंमत पाहता, व्यापाऱ्यांना १० ते १५ रुपये प्रति क्विंटल फायदा होत आहे.
खाद्य मंत्रालयाच्या एक वरिष्ठ अधिकारीनुसार, चालू हंगामात खुले बाजार विक्री योजनेच्या (ओएमएसएस) अंतर्गत, रेकॉर्ड ८० लाख टन गहूची विक्री झाली असून सुध्दा किंमतीत काही घट झाली नाही, म्हणूनच एफसीआयकडून मोठ्या गहू व्यापारीदारांची यादी देण्यास सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, व्यापारीद्वारा खरेदी केलेले आणि विक्री झालेल्या गहूची माहिती घेतली जाईल. पीक हंगाम २०१७-१८ मध्ये केवळ १४.२१ लाख टन गहू ओएमएसएस अंतर्गत विक्री झाली. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
18
0
संबंधित लेख