कृषि वार्ताकृषी जागरण
कृषी क्षेत्रात महिलांचे योगदान वाढविण्यावर भर - कृषीमंत्री
कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध योजनांद्वारे ३० टक्कयापेक्षा ही जास्त फंडाचे वाटप कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवित आहेत. ७ मार्चला, केंद्रीय कृषीमंत्री राधा मोहन यांनी सांगितले की, कृषी क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध योजनांद्वारे ३० टक्कयापेक्षा ही जास्त फंडाचे वाटप महिलांसाठी करण्यात आले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी महिलांची कृषी क्षेत्रातील भूमिका आणि योगदान यावर विशेष भर दिला जात असल्याचेदेखील त्यांनी यावेळी सांगतिले.
केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की, शेती क्षेत्रातील महिला यशस्वी होण्यासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये कृषी संबंधित विविध फायदे व योजनेचा लाभ महिला शेतकऱ्यांना मिळाला आहे. संदर्भ – कृषी जागरण, ८ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
152
0
संबंधित लेख