कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गहूच्या सरकारी खरेदीमध्ये १०% घट
चालू रबी विपणन हंगाम २०१९ -२० मध्ये गहूचे किमान समर्थन मूल्य (एमएसपी) वर खरेदीमध्ये १०.२८ टक्क्यांची घट होऊन २६५.२९ लाख टन झाली आहे, तर मागील वर्षी रबी हंगामातील खरेदी २९४.७० लाख टन झाली होती. चालू रबीमध्ये गहूची एकूण खरेदी ३५६.५० लाख टन कमी होण्याची शक्यता आहे.
भारतीय खाद्य निगम (एफसीआई) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उत्पादक राज्यामध्ये एप्रिलमध्ये अनिश्चित पडलेल्या गारांच्या पावसामुळे पिकांची आवक करण्यास उशीर झाला आहे. या कारणामुळे चालू रबीमध्ये गहूच्या खरेदीमध्ये घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. तथापि, आठवड्याभरात उत्पादक बाजारपेठेमध्ये गहूची दैनिक आवकचा दबाव वाढत चालला असल्यामुळे सरकारी खरेदी देखील वाढत आहे. चालू रबीमध्ये एमएसपीवर गहूच्या खरेदी करण्याचे उद्दिष्ट ३५६.५० लाख टन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी केंद्र सरकारने गहूचा एमएसपी १,८४० रुपये प्रति क्विंटल करण्याचे निश्चित केले आहे. कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या अग्रिम अंदाजानुसार, चालू हंगाम २०१८-१९ मध्ये गहूची नोंद ९९१.२ लाख टन उत्पादन होणे अपेक्षित आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ८ मे २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
12
0
संबंधित लेख