कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कृषी उत्पादनांची निर्यात वाढविणार
नवी दिल्ली: कृषी उत्पादनांची निर्यात वाढविण्यासाठी केंद्र सरकारने तांदूळ व चहासोबच अन्य काही उत्पादनांवर निर्यातकांना अतिरिक्त मुल्य देण्याची तयारी केली आहे. त्याचबरोबर २०२२ पर्यंत कृषी उत्पादनांच्या निर्यातला ६ हजार करोड डॉलरपर्यंत पोहचण्याचे ध्येय ठेवले आहे. जे की, चालू वित्त वर्ष २०१९-२० च्या पहिल्या दोन महिन्यात कृषी उत्पादनाच्या निर्यातीमध्ये ७.७३ टक्के घट झाली आहे. २०१८-१९ मध्ये १,२८,३०२ करोड रूपये कृषी उत्पादनाची निर्यात झाली आहे. वाणिज्य एवं उदयोग मंत्रालयाचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, निर्यातकांना मर्चेंडाइज एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया स्‍कीम (एमईआईएस) अतंर्गत अतिरिक्त मुल्य देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अॅग्री उत्पादनाच्या निर्यातीमध्ये सर्वात जास्त वाटा तांदूळ, चहा, मसालासोबतच कांदा, बटाटा व टोमॅटोचा आहे. बिगर बासमती तांदळाची विश्व बाजारामध्ये किंमती कमी आहे. जे की घरेलू बाजारमध्ये किंमती जास्त आहे. या कारणाने चालू वित्त वर्ष पहिल्या दोन महिन्यात याच्या निर्यातीमध्ये ५० टक्क्यापेक्षा ही अधिक कमी आली आहे. चहाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे, मात्र यामध्ये श्रीलंका आव्हानात्मक प्रतिस्पर्धी दिसत आहे. यामुळे चहा निर्यातकांना अतिरिक्त मुल्य देण्याचा प्रस्ताव आहे. संदर्भ: आउटलुक अॅग्रीकल्चर, २७ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
26
1
संबंधित लेख