AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Sep 19, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
आता, शेतकऱ्यांना भाडयाने मिळणार ट्रॅक्टर
नवी दिल्ली- कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांसाठी भाडेतत्वावर ट्रॅक्टर सुविधा देण्याची योजना बनविली आहे. यंत्रांच्या अभावी शेती करण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने 'CHC Farm Machinery' अँप तयार केले आहे. या अँपच्या माध्यमातून शेतकरी शेतीच्या कामासाठी आता भाडेतत्वावर ट्रॅक्टर घेऊ शकणार आहे.
कृषी मंत्रालयाचे हे अँप गुगल प्ले स्टोअरवर भिन्न १२ भाषेत 'CHC Farm Machinery' नावाने उपलब्ध केले आहे. या अँपच्या माध्यमातून आपल्या लोकेशन व दिल्या गेलेल्या पत्त्यावर ट्रॅक्टर पोहचेल. अँपमध्ये आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबरसोबत अन्य महत्वाची माहिती यावर शेअर करावी लागेल. यासाठी शासनाने आतापर्यंत ३४ हजारपेक्षा अधिक कस्टम हायरिंग केंद्र निर्माण केले आहे. या केंद्रावरून शेतकऱ्यांना सहायता मिळण्याची योजना आहे. या योजनेमुळे लघु उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. संदर्भ – कृषी जागरण, १२ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1846
1