कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शासन थेट डाळवर्गीय, कांदे व टोमॅटो विकण्याच्या तयारीत!
नवी दिल्ली – शासन ग्राहकांना घर बसल्या स्वस्त दरात डाळवर्गीय, कांदे व टोमॅटो विकण्याची योजना तयार करत आहे. ग्राहक मामले मंत्रालय, नाफेड व अन्य सार्वजानिक कंपन्या मिळून ही योजना सुरू करणार आहे. खादय व ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, डाळवर्गीय, कांदे व टोमॅटो थेट ग्राहकांना विकण्याची योजना आहे. यामुळे ग्राहकांना योग्य किंमतीत डाळवर्गीय, कांदे व टोमॅटो उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना ही पिकासाठी योग्य किंमत मिळेल तसेच महागाईवर नियंत्रण ठेवून डाळवर्गीय व कांदयाचा साठा वाढण्यास मदत होईन. ग्राहकांना याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालय ई-कॉमर्स कंपन्यांसोबतदेखील चर्चा झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली शासन, दिल्ली एपीएमसी, सफल व नाफेडचे आधिकाऱ्यांसोबत ही बैठक झाली आहे.
नाफेड डाळवर्गीयांची खरेदी शेतकऱ्यांकडून एमएसपीवर करत आहे. त्याचबरोबर बफर पुरवठयासाठी कांदयाची ही खरेदी करत आहेत, अशा प्रकारे टोमॅटोची ही खरेदी थेट शेतकऱ्यांकडून केली जाईल. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १८ सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
111
0
संबंधित लेख