AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
आता, खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये
नवी दिल्ली: खतांचा पुरवठा, साठा व गरज या तिन्ही बाबींची एकत्रित माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर खतांची माहिती देणारी यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. पॉईंट ऑफ सेल अर्थात ‘पीओएस’ मिशन सॉफ्टवेअरचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. खत अनुदानाचा थेट शेतकऱ्यांपर्यंत लाभ पोहचविण्याच्या उद्देशानेच ‘पीओएस’ तंत्रज्ञान विकसित केले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली. पारदर्शीपणा घेऊन खतांच्या काळया बाजाराला लगाम बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा केंद्राचा मानस असून, आम्ही त्या अनुषंगाने विविध उपाययोजना अंमलात आणत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, सध्या देशातील २ लाख २४ हजार खत दुकानांमध्ये ‘पीओएस’ सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात खतांचे अनुदान जमा करण्यासाठी केंद्राने ७० हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. संदर्भ – पुढारी, ११ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
200
0