AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Apr 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
केंद्राने गहूचे आयात शुल्क १० टक्क्यांनी वाढविले
नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी गहूच्या आयात शुल्कमध्ये १० टक्क्यांची वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनानुसार, आयात शुल्कमध्ये ३० टक्क्यांनी वाढ करून ४० टक्के केले आहे. केंद्राने चालू रब्बी विपणन हंगाम २०१९ -२० साठी गहूचे किमान समर्थन मूल्य (एमएसपी) १,८४० रू. प्रति क्विंटल निश्चित केले आहे. केंद्र सरकारने चालू रब्बी विपणन हंगाम २०१९-२० मध्ये समर्थन मूल्यवर ३५७ लाख टन गहू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. जे की मागील वर्षी, रब्बीमध्ये ३५७.९२ लाख टन गहूची खरेदी करण्यात आली होती. चालू रब्बी हंगाम २०१९ मध्ये देशातील गहूचे रेकॉर्ड उत्पादन ९९१.२ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जे की मागीलवर्षी, ९७१.१ लाख टनचे उत्पादन झाले होते.
चालू रब्बी विपणन हंगाम २०१९-२० मध्ये एमएसपीवर गहूची सरकारी खरेदी ६२.८० टक्क्यांनी घसरून ७०.१० लाख टन झाली आहे. जे की मागील वर्षी, रब्बी हंगामात समान कालावधीत १८८.४९ लाख टन गहूची खरेदी झाली होती. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २७ एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0