कृषी वार्तान्यूज18
सेंद्रीय शेतीसाठी केंद्र सरकार देणार प्रति हेक्टर ५० हजार रू.
नवी दिल्ली: शेतकऱ्यांना कमी खर्चात, जास्त उत्पादन मिळावे व जमिनीची सुपीकता कमी होऊ नये यासाठी केंद्र सरकारने 'पारंपारिक कृषी विकास योजना' (पीकेवीवाय) लागू केली आहे. देशातील बहुतेक शेतकऱ्यांना माहिती नाही की, सेंद्रिय शेती कशी होईल आणि बाजारपेठ काय आहे. मात्र आता या प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळणार आहेत. केंद्राने यासाठी सेंद्रीय शेती पोर्टल (https://www.jaivikkheti.in/) सुरू केले आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मतानुसार, केंद्र सरकार पारंपारिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी २०१५-१६ पासून २०१९-२० पर्यंत १६३२ कोटी रुपये दिले आहेत.
या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रतिहेक्टर ५० हजार रुपये मिळतील. त्याअंतर्गत तीन वर्षांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सेंद्रिय खत, सेंद्रिय कीटकनाशके आणि गांडूळ खत इ. खरेदीसाठी ३१,००० रुपये (६१ टक्के) मिळतात._x000D_ याव्यतिरिक्त सेंद्रिय शेती पोर्टलवर आतापर्यंत २,१०,३२७ शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. त्याचबरोबर ७१०० स्थानिक गट, ७३ इनपुट पुरवठा करणारे, ८८९ सेंद्रिय उत्पादन खरेदीदार व २१२३ उत्पादने नोंदणीकृत आहेत._x000D_ संदर्भ – न्यूज १८, ११ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा_x000D_
2020
0
संबंधित लेख