कृषी वार्ताकृषी जागरण
e-NAM पोर्टलमध्ये सरकारने जोडल्या नव्या ४१५ मंडई
• केंद्र सरकारने भारतभरातील तब्बल ४१५ नव्या मंडई ई-नाम पोर्टलमध्ये जोडल्या आहेत. यामुळे नॅशनल कृषी मार्केटमध्ये जुडलेल्या मंडईंची संख्या १ हजार झाली आहे. सध्याच्या घडीला १.६८ कोटी शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना या ई-नामशी जोडल्या गेल्या आहेत. नोंदणी झालेले शेतकरी, व्यापारी आणि शेतकरी उत्पादक संघटना हे आपल्या घरात बसून भारतातील ई-मंडईमध्ये आपला शेतमाल विकू शकतात.  शेतकरी ई-नामचा कसा घेऊ शकतात फायदा:- • साधारण २२ कोटी शेतकरी या ई-नाम पोर्टलच्या मदतीने आपला शेतमाल देशाच्या निरनिराळ्या मंडईत विकू शकतात. याद्वारे सर्वोत्तम भाव, योग्य बाजारपेठ या पोर्टलच्या माध्यमातून मिळते. हा सर्व व्यवहार उत्पादक शेतकरी आणि थेट ग्राहकांमध्ये होत असतो, त्यामुळे यात कोणत्या मध्यस्थांची गरज नसते. आणि कमी खर्चात आपला माल ग्राहकांकडे पोहचत असल्याने शेतकऱ्यांना अधिक नफा मिळतो.  ई-नाम शी शेतकरी कसे जुडतील- • enam.gov.in. या संकेतस्थळावर जा. तेथील सर्च बारवर जा आणि सर्चमध्ये नोंदणी या पर्यायाला क्लिक करा, त्यानंतर फार्मर(farmer) हे पर्याय निवडा. आपल्या ईमेल आयडीच्या मदतीने लॉन इन करा, त्यानंतर तुम्हाला तुमच्या इ-मेलवर एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड येईल. त्यानंतर तुम्हाला एक तात्पुरती ईमेल आय़डी आणि पासवर्ड मिळेल. याच्या आधारे तुम्ही लॉगिन करु शकता. लॉगिन केल्यानंतर सुरु होणाऱ्या डासबोर्डमध्ये तुम्ही आपल्या कागदपत्रांची नोंदणी करु शकता. कृषी उत्पन्न बाजार समितीकडून यास मान्यता मिळाली की तुम्ही व्यवहार करण्यास सुरुवात करु शकता. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही https://enam.gov.in/web/resources/registration-guideline या संकेतस्थळावर जाऊ माहिती घेऊ शकता. संदर्भ:- कृषी जागरण १३ एप्रिल २०२० हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
536
0
संबंधित लेख