AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Apr 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
पाहा, देशात यंदा चांगला मान्सून - हवामानविभाग
नवी दिल्ली: पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. के. जे. रमेश यांनी नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेमध्ये मॉन्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्याचबरोबर यंदा देशात सर्वत्र पावसाचे चांगले वितरण अपेक्षित असून, खरीप हंगामात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याची माहितीदेखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदाच्या मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३९ टक्के), तर दुष्काळाची शक्यता १७ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. गेल्या वर्षी हवामान विभागाने देशात ९७ टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. प्रत्यक्षात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस पडला होता.
आयएमडीकडून दोन टप्प्यांत हवामानाचे पूर्वानुमान वर्तविण्यात येते. यात एप्रिल महिन्यात प्राथमिक तर जून महिन्यात दुसऱ्या टप्प्यातील पावसाचा अंदाज दिला जातो. आयएमडीच्या डायनानिकल कपल्ड ओशन-ॲटमॉस्फिअर ग्लोबल क्लायमेट फोरकास्टिंग सिस्टिमनुसार (सीएफएस) यंदाच्या मॉन्सून हंगामात ९४ टक्के पावसाची शक्यता आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, 15 एप्रिल 201 9 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
275
0