AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
30 Nov 19, 06:30 PM
जैविक शेतीअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
‘असे’ घ्या गुणवत्तापूर्ण उत्पादन
सध्याच्या काळात कीड व रोग नियंत्रणासाठी सरार्स रासायनिक कीटकनाशके व बुरशीनाशके यांचा बेसुमार वापर केला जातो. यामुळे याचे खालील दुष्परिणाम आढळून येतात. • उत्पादनामध्ये रासायनिक घटकांचे अंश आढळून येतात, त्यामुळे विविध आजारांचे प्रमाण हे मानव तसेच प्राण्यांमध्ये वाढले आहे. • कीड व रोगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होऊन ते नियंत्रित होत नाही. • बेसुमार रसायनांमध्ये शेतकऱ्याचा खर्च वाढून उत्पादनात घट येते. • पाणी, हवा, माती यांची गुणवत्ता कमी होऊन जैवविविधतेवर त्याचे वाईट परिणाम झाल्याचे आढळून आले आहेत. यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
कीड व रोग व्यवस्थापन - पीक लागवड केल्यानंतर अथवा बियाणे उगवून आल्यानंतर पिवळ्या व निळ्या चिकट सापळ्यांचा वापर करावा, फुलोरा अवस्थेपूर्वी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. जेणेकरून पिकात कुठल्या रसशोषक कीड व फळमाशीचा प्रादुर्भाव आहे व किती प्रमाणात आहे हे समजते. पीक वाढीच्या अवस्थेनुसार व किडीच्या असणाऱ्या प्रादुर्भावावरून योग्य त्या रसायनाची निवड करून फवारणी घेणे सोपे जाते. सुरुवातीला जैविक अथवा सेंद्रिय औषधांचा वापर फवारणीसाठी करावा नंतर रासायनिक औषधे फवारणीसाठी वापरावे. त्याचबरोबर लागोपाठ एकाच रसायनाचा वापर पिकास वारंवार करणे टाळावा. औषधांचा चांगला परिणाम दिसण्यासाठी औषधांचे वापरण्याचे योग्य प्रमाण, फवारणीची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्याचबरोबर कुठल्या कीड, रोगाचा प्रादुर्भाव व कुठले पीक आहे यावरून फवारणी पंपाचे नोझल निवडणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विविध रसायनांचे एकत्रित मिश्रण करण्यापूर्वी ते योग्य आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे. तयार केलेले औषधांचे द्रावण दोन तासापेक्षा जास्त काळ राहणार नाही याची काळजी घ्यावी. रसायनांची योग्य हाताळणी - फवारणी करताना संरक्षित कीटचा वापर करावा. फवारणीनंतर रिकाम्या रासायनिक बाटल्या, पाकिटांची योग्य विल्हेवाट लावावी. शेतीच्या कडेला तसेच लहान मुले, जनावरे, पक्षी, पाणी, माती व हवेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. फवारणी पंप वापरण्यापूर्वी व वापरल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवावा. वरील बाबी लक्षात घेऊन पीक व्यवस्थापन केलं तर नक्कीच अतिरिक्त वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा वापर कमी होईल व कीड, रोग यांना नियंत्रित ठेऊन गुणवत्तापूर्ण उत्पादनात भर पडेल. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
126
0