AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Mar 20, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
पीएम-किसान योजेनचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवा आधार कार्ड व बँक पासबुकचा फोटो
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात शासनाने देशातील 3.36 कोटी शेतकर्‍यांना पहिल्या हप्त्याचे 2-2 हजार रुपये दिले आहेत. जर आपल्याला या योजनेचे पैसे अदयाप ही मिळाले नसेल, तर आपण प्रथम आपल्या लेखापाल आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. येथून ही आपली समस्या दूर होत नसेल, तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेला टोल फ्री हेल्पलाईन नंबर पीएम-किसान हेल्पलाईन 155261 किंवा 1800115526 वर संपर्क साधा. जर या नंबरवर ही कॉल लागला नाही, तर दुसरा नंबर 011- 23381092 वर संपर्क साधा. याशिवाय ज्या शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, नाव व बँक खाते क्रमांक चुकीचा असल्याने, त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. कारण कृषी कार्यालयात न जाता देखील त्यांचे प्रश्न सुटतील. त्यांनी फक्त विभागाव्दारे दिलेल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर आधार कार्ड आणि बँक पासबुकचा फोटो पाठविणे आवश्यक आहे. यानंतर विभागीय कर्मचारी समस्या दूर करण्यात सक्षम होतील. संदर्भ – कृषी जागरण, 23 मार्च 2020 ही महत्वपूर्ण माहिती लाइक करा व आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा
2313
104