कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
१५ ऑगस्टपासून शेतकरी पेंशन योजनेसाठी प्रीमियम
नवी दिल्ली: ‘पंतप्रधान शेतकरी पेंशन योजने’साठी शेतकऱ्यांना प्रीमियम जमा करण्याची सुरूवात केंद्र सरकार १५ ऑगस्टपासून करणार आहे. शेतकरी पेंशन योजनेसाठी १८ ते ४० वर्षापर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतात. या योजनेमध्ये ६० वयानंतर शेतकऱ्यांना तीन हजार रूपयांपर्यंत प्रति महिना पेंशन मिळेल. कृषी सचिवने राज्य सरकारला पत्र लिहून योजना लागू करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. या योजनेअंतर्गत भारतीय जीवन बीमा निगम(एलआईसी) शेतकऱ्यांचे पेंशन फंडचे व्यवस्थापन करतील. या पेंशनच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ६० वयानंतर तीन हजार रू. मासिक पेंशन देण्यासाठी सूचना केली आहे. या योजने अंतर्गत तीन वर्षामध्ये ५ करोड लाभार्थिंना सहभागी करून घ्यायचे आहे. यामुळे शासकीय तिजोरीवर जवळजवळ १०, ७७४.५ करोड रू. वर्षभर खर्च पडेल. प्रीमियमचा अर्धा हिस्सा शेतकरी व अर्धा हिस्सा सरकारचा असेल. पुढील आठवडयापासून यासाठी रजिस्ट्रेशनला सुरूवात केली जाईल. केंद्र सरकार याचा पूर्ण खर्च उचलेल, तथा राज्य सरकारवर कोणत्याही प्रकारचा वित्तीय खर्चाचा ताण पडणार नाही. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ३ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
156
0
संबंधित लेख