कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
खरीपमध्ये खादयान्न उत्पादन स्थिर राहण्याचे अनुमान
देशातील काही राज्यांमध्ये चालू खरीपमध्ये मान्सून पाऊस कमी पडला असला, तरी खादयान्न उत्पादन मागील वर्षीप्रमाणे लगबग बरोबर होण्याची आशा आहे, कारण भात व अन्य पिकांच्या पेरणीसाठी अजून ही वेळ आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) चे महासंचालक त्रिलोचन महापत्रा यांनी दिल्लीमधील पत्रकारांना सांगितले की, खरीप हंगामातील पिकांची पेरणी जवळजवळ मागील वर्षी इतकेच होण्याचा अंदाज आहे. कारण भाताची पेरणी ऑगस्टच्या शेवटच्या आठवडयापर्यंत होणार असल्याने यासाठी आणखी वेळ आहे. चालू खरीप हंगामात पहिल्या जून ते १६ जुलैपर्यंत देशभरात मान्सून पाऊस सामान्यपणे १४ टक्के कमी झाला आहे. या दरम्यान सामान्यत: ३०८.४ मिमी पाऊस होतो, जे की चालू हंगामात केवळ २६५.९ मिमी पाऊस झाला आहे. संदर्भ – १७ जुलै २०१९, आउटलुक अॅग्रीकल्चर
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
9
0
संबंधित लेख