कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
खरीपमध्ये खादयान्न उत्पादन मागील वर्षापेक्षा जास्त होण्याचा अंदाज
नवी दिल्ली – चालू खरीपमध्ये खादयान्नचे उत्पादन मागील वर्षीच्या १४.१७ करोड टनपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. केंद्रीय कृषी राज्य मंत्री पुरूषोत्तम रूपाला यांनी सांगितले की, यंदा मान्सून हंगाम दरम्यान देशामध्ये चांगला पाऊस झाला असल्याने, खरीप पिकांचे उत्पादन जास्त होण्याचा अनुमान आहे. त्याचबरोबर रबी पिकांच्या पेरणीसाठी ही स्थिती उत्तम आहे.
रूपाला यांनी सांगितले की, जास्त पाऊस झाल्याने देशामधील १२ राज्यात पूर आला आहे, तरी खादयान्न उत्पादन जास्त होण्याचा अंदाज आहे. देशात खरीप हंगामात पाऊस जास्त झाल्याने जलाशयेदखील भरले आहे. त्याचबरोबर डाळवर्गीयांमध्येदेखील चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असून, तेलवर्गीयांचे उत्पादन वाढण्याची गरज आहे. ज्यामुळे आयातवरील निर्भरता कमी होऊ शकते. पीक हंगाम २०१९-२० मध्ये डाळवर्गीय उत्पादनाचे लक्ष्य २६३ लाख टन ठरविले आहे. जे की गहूचे रेकॉर्ड उत्पादन १०.०५ करोड करण्याचे लक्ष्य ठरविले आहे. तांदळाचे उत्पादनाचे लक्ष्य चालू खरीपमध्ये ११.६० करोड टन होईन असा अंदाज आहे. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २० सप्टेंबर २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
53
0
संबंधित लेख