AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Jan 20, 06:30 PM
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
जनावरे ओळखण्याच्या सोप्या पध्दती
जर पशुपालकांकडे जनावरांची संख्या कमी असेल, तर त्यांचे प्रत्येक जनावर ओळखणे आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे ठेवणे शक्य आहे. मात्र आधुनिक पध्दतीचा अवलंब करणाऱ्या मोठ्या संख्येच्या जनावरांच्या संगोपनासाठी जनावरे ओळखण्यासाठी विशिष्ट पद्धत असणे आवश्यक आहे. जनावरांना ओळखण्याचे महत्त्व: • जनावरांचे प्रजनन, वासराची नोंदणी, मृत जनावरांचे / वासराचे तपशील, जनावरांचे उपचार, जनावरांच्या दुग्ध उत्पादनाची नोंदणी यासारख्या मोठ्या प्रमाणावर दैनंदिन कामकाजासाठी सर्व प्रकारच्या पशुधनाची ओळख आवश्यक आहे. • जनावरांची नोंदणी आणि विमा पॉलिसीसाठी जनावरे ओळखणे आवश्यक आहे. जनावरे ओळखण्याच्या पद्धती: नाव: जनावरांच्या खरेदीचे ठिकाण, भौतिक स्वरूप किंवा नदीचे नाव, देवीचे नाव इत्यादी. उदाहरणार्थ, गंगा, जमना, गायत्री इ. बहुतेक लोक ही प्रथा अवलंबतात. याशिवाय टॅटू, इअर टॅगिंग, ब्रँडिंग इत्यादी इतर मार्ग आहेत. या पद्धतीची सविस्तर माहिती पुढील लेखात दिली जाईल. संदर्भ – अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सिलेंस जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
122
0