पशुपालनअॅग्रोवन
जनावरांतील आजार प्रथमोपचाराने बरे होतील
जनावरांमध्ये विविध प्रकारचे विषाणूजन्य व जीवाणूजन्य आजार आढळतात. हे आजार विविध माध्यमातून निरोगी जनावरांच्या शरीरात प्रवेश करतात. अनुकूल हवामान मिळाल्यास असे विषाणू, जिवाणू विविध अवयवात प्रादुर्भाव करतात. अशा आजारांच्या लक्षणांची माहिती असल्यास आजारी जनावरे लवकर लक्षात येऊन होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. १. पोट फुगी जनावराचे पोट डाव्या कुशीमध्ये फुगते. पोटामध्ये वायू भरल्यामुळे डाव्या कुशीचा भाग वर येतो. जनावर बैचन होते, चार पाणी खाणे सोडून देते व रवंथ करणे बंद होते. पोटामध्ये वायू तयार होण्याचे प्रमाण जास्त असल्यास जनावरास श्वास घेण्यास त्रास होतो. कधी जनावर तोंड उघडून श्वास घेते. हा आजार प्रामुख्याने ओला व कोवळा चारा खूप जास्त प्रमाणात आणि अति घाईने खाल्ल्यास होतो. उपचार प्राथमिक उपचार म्हणून पोटाच्या डाव्या बाजूस मसाज करावा. जनावराच्या तोंडात लाकडी काठी बांधल्यास लाळ स्रावून पोटफुगी कमी होण्यास मदत होते. पोटफुगीची तीव्रता जास्त असल्यास पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावा.
२. अपचन खुराक, धान्य किंवा घरातील शिळे अन्न जास्त प्रमाणात जनावरांना दिल्यास किवा जनावरांनी अपघाताने खाल्ल्यास अपचन हा आजार होतो. यामुळे आजारी असलेले जनावर खाणे पिणे बंद करते, पोट काही प्रमाणात फुगते, रवंथ करणे बंद होते व जनावर सुस्त होते. अपचनाची तीव्रता जास्त असल्यास जनावर सुस्त व अशक्त होते. उपचार खाण्याचा सोडा किवा मॅग्नेशिअम सल्फेट कोमट पाण्यात मिसळून पाजावे व पशुवैद्याकडून तत्काळ उपचार करून घ्यावा. संदर्भ - अॅग्रोवन जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
291
0
संबंधित लेख