मान्सून समाचारलोकमत
विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्यता
कोकण, गोवा व मध्ये महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात बहुतांशी ठिकाणी तर मराठवाडयात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. मराठवाडा व विदर्भात अजूनही जोरदार पावसाची आवश्यकता आहे. पुढील चार दिवस प्रामुख्याने कोकण, गोव्यात काही भागात जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ८ ते ११ जुलैदरम्यान कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडयात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. _x000D_ संदर्भ – लोकमत, ८ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
246
0
संबंधित लेख