AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्ताकृषी जागरण
शेतकऱ्यांना पडिक जमिनींचा होणार फायदा!
शासन आता सौर ऊर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतकऱ्यांना मोठया प्रमाणात उत्पन्न मिळावे यासाठी एक संधी उपलब्ध करून देत आहे. जेणेकरून शासनासोबतच शेतकरी व सामान्य जनतेला ही लाभ होईन. कारण शासन आता सौर ऊर्जा प्लांटसाठी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनींचा वापर करणार आहे. शेतकऱ्यांना या जमिनीचे भाडेदेखील मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ १ एकर जमीन आहे त्यांना वर्षाला शासन ८० हजार रू. देणार आहे. ही ‘शेतकरी ऊर्जा सशक्तिकरण मिशन’ (कुसुम) योजना लवकरच सुरू करणार आहे. या योजने अंर्तगत शेतकरी शेतीमध्ये सौर ऊर्जा प्लांटसोबत भाजी व इतर छोटी पिके ही घेवू शकतात. नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (एमएनआरई) च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्लांटला लावण्यासाठी ५ एकर जमीनीची गरज आहे. एक मेगावॅट सौर ऊर्जा प्लांटने एक वर्षात लगभग ११ लाख यूनिट वीज उपलब्ध होऊ शकते.
ज्या शेतकऱ्यांजवळ एक एकर जमीन आहे ते त्यावर ०.२० मेगावॅट प्लांट लावू शकतात. या प्लांटने साधारण वर्षाला २.२ लाख यूनिट वीज निर्माण केली जाऊ शकते. कुसुम योजने अंतर्गत प्लांटला लावण्यासाठी शेतकऱ्यांकडून या करारावर स्वाक्षरी घेतली जाणार आहे. तसेच जमिनीवर हक्क त्या त्या शेतकऱ्यांचाच असणार आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना दुप्पट फायदा होणार आहे. तो म्हणजे एका बाजूने जमिनीवर भाडेतत्व मिळणार, तर दुसऱ्या बाजूने शेतकरी या जमिनीवर छोटी पिके ही घेऊ शकतात त्यामुळे ही योजना नक्कीच शेतकऱ्यांना आनंद देणारी ठरणार आहे. संदर्भ - कृषी जागरण, २२ जानेवारी २०१९
349
0