AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्तान्यूज18
शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 36 हजार रुपये
नवी दिल्ली - पंतप्रधान किसान मानधन योजने अंतर्गत आतापर्यंत 19,60,152 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. या निवृत्तीवेतन योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात 2 हेक्टरांपर्यंत शेतीयोग्य जमीन असलेल्या 5 करोड शेतकऱ्यांना जोडायचे आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व 12 कोटी लघु व सीमांत शेतकरी या योजनेशी जोडले जाणार आहे.
केंद्र सरकारने 9 ऑगस्ट 2019 पासून या योजनेसाठी नोंदणी सुरू केली आहे. यामध्ये केवळ 18 ते 40 वर्षापर्यंतचे शेतकरीच नोंदणी करू शकतात. या योजनेंतर्गत वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा 3000 रुपये पेन्शन देण्यात येईल अर्थातच 36 हजार रुपये वार्षिक रक्कम दिली जाईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर शेतकरी पंतप्रधान-किसान सन्मान निधीचा लाभ घेत असतील तर त्यासंबंधीत कोणतीही कागदपत्रे घेतली जाणार नाहीत. पीएम किसान या योजनेतून मिळणाऱ्या लाभच्या माध्यमातून थेट अंशदान करण्याचा विकल्पाची निवड करू शकतात, अशा प्रकारे त्यांना थेट खिशातून पैसे खर्च करावे लागणार नाहीत. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या मते, हरियाणामध्ये पंतप्रधान-किसान मानधन योजनेत सर्वाधिक 4,03,307 शेतकरी जोडले आहेत. यानंतर बिहारचा नंबर येतो. बिहारमध्ये 2,75,384 शेतकर्‍यांनी त्याचा अवलंब केला आहे. झारखंड अनुक्रमे 2,45,707 शेतकरी, उत्तर प्रदेश 2,44,124 शेतकरी आणि छत्तीसगड 2,00,896 शेतकर्‍यांसह अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचवे स्थानावर आहे. संदर्भ – न्युज 18, 15 फेब्रुवारी 2020 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर फोटोच्या खाली असलेल्या पिवळ्या अंगठ्याच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायांद्वारे आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.
1484
51