कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल
शेतीत आधुनिक तंत्र अवलंब करून शेतकरी उत्पन्न वाढवू शकतात. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय व मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री प्रतापचंद्र सारंगी यांनी शेतकर्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी यांत्रिकीकरणावर जोर दिला. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) च्या वतीने राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिसरामध्ये कृषी व ग्रामीण उपक्रमांना प्रोत्साहन व विकासासाठी एमएसएमईच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी सारंगी यांनी वैज्ञानिकांनी विकसित केलेल्या कृषी तंत्रज्ञानामध्ये नवीन तंत्रज्ञान अवलंबण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करून, सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले. कृषी संशोधन व शिक्षण विभाग (डेअरी) चे सचिव आणि आयसीएआरचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी यावर भर दिला की कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल कारण खर्च, वेळ आणि श्रम कमी होऊन उत्पादकता वाढेल. ते म्हणाले की, आयसीएआर हे शेतीच्या आधुनिक यांत्रिकीकरणाच्या दिशेने कार्य करण्यासाठी वचनबद्ध आहे. स्रोत - आउटलुक अॅग्रीकल्चर, २२ ऑगस्ट २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
47
0
संबंधित लेख