AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Feb 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गहू व तेलबियांणी होणार शेतकऱ्यांना फायदा!
चालू हंगामामध्ये हिवाळा लांबणीमुळे रब्बीचे प्रमुख पीक गहूबरोबरच तेलबियांचे उत्पादन जास्त होण्याचा अंदाज आहे. कृषी आयुक्त एस के मल्होत्रा यांनी सांगितले की, चालू रब्बीमध्ये गहूचे उत्पादन वाढवूण १० कोटी टन पेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (फिक्की) मध्ये आयोजित मिंट फार्मिंग संमेलन दरम्यान मल्होत्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, चालू महिन्यात उत्पादक राज्यांमध्ये पावसामुळे गहूच्या पिकाला फायदा झाल्याने गहूच्या प्रतिहेक्टर उत्पादनात ही वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रब्बी पीक हंगाम २०१८-१९ मध्ये गहू उत्पादन वाढून १० कोटी टनपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. जे मागील वर्षी रब्बी हंगामात ९.९७ कोटी टन उत्पादन झाले होते. चालू रब्बीमध्ये डाळींचे उत्पादन मागील वर्षात अंदाजे २५० लाख टनच्या आसपास असल्याचा अंदाज आहे. तथापि, तेलबियांचे उत्पादन चालू रब्बी हंगामात ३२० ते ३३० लाख टन होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर
डाळीमध्ये देश जवळजवळ आत्मनिर्भर झाला आहे आणि आता सरकारचे लक्ष खाद्यान्न तेलच्या आयातमध्ये बिलाची कपात करण्यासाठी तेलचे उत्पादन वाढविण्यावर जोर दिला आहे. देशामध्ये खादय तेलाची वार्षिक आयात सुमारे ७०,००० कोटी रुपयांची होते. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २१ फेब्रुवारी २०१९
79
0