कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
तागच्या उत्पादन निर्यातीत २४ टक्क्यांनी वाढ
ताग उत्पादन व त्यापासून बनविलेल्या विविध प्रकारच्या वस्तूमध्ये मागील पाच वर्षामध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या चार दिवसीय प्रर्दशनामध्ये १४ देशाचे प्रतिनिधी व ७० पेक्षा जास्त अधिक खरीदीदार भाग घेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी कोलकत्ता ताग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी दिली.
या कार्यक्रमाप्रसंगी टेक्सटाइल राघवेन्द्र सिंह म्हणाले की, मंत्रालय हातमाग करणाऱ्या व्यावसायकांची उत्पन्न कसे वाढेल या गोष्टींचा विचार करत आहे, तसेच त्यांना वस्त्र उदयोगांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे त्याचबरोबर मंत्रालय देशाच्या ४० जिल्हयात हातमाग व शिल्पकाराना सहाय्यतादेखील देत आहे. या अंतर्गत खूपच कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन व पुरवठा ही केला जाईल, जेणेकरून महिलांना ते स्वस्त किंमतीत उपलब्ध होईल. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ८ जानेवारी २०१९
1
0
संबंधित लेख