AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
हंगामाच्या सुरूवातीलाच १० लाख कापूस गाठींची निर्यात
नवी दिल्ली: ऑक्टोबर २०१९ पासून सुरू झालेल्या चालू हंगामात ३१ डिसेंबरपर्यंत १० लाख गाठी (एक गाठी - 170 किलो) कापूस निर्यात झाला आहे. त्याचबरोबर या दरम्यान सुमारे ६.५० लाख गाठी आयातदेखील झाल्या आहेत. ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या चालू पीक हंगामात २०१९-२० मध्ये कापसाचे उत्पादन १३.६२ टक्क्यांची वाढ होऊन ३५४.५० लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) च्या मते, कापसाचे उत्पादन ३५४.५० लाख गाठी होण्याचा अंदाज आहे, जे की मागीलवर्षी ३१२ लाख गाठीपेक्षा जास्त आहे. ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत बाजारपेठेत १२५.८९ लाख कापसाच्या गाठी आल्या आहेत. चालू हंगामात उत्पादन अधिक असल्याने सूत गिरण्यांची मागणीदेखील कमी आहे, ज्यामुळे बाजारपेठेत कापसाचे किमान आधारभूत किंमती (एमएसपी) च्या खाली आहे. बाजारपेठेतील कापसाचे भाव ४,९०० ते ५,२०० रू. प्रति क्विंटल आहे, जे की केंद्र शासनाने चालू पीक हंगाम २०१९-२० साठी कापसाचा एमएसपी ५,२५० – ५,५५० रू. प्रति क्विंटल ठरला आहे. उत्तर भारतात कापसाचे उत्पादन ६१ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. मध्य भारतातील राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन १९७ लाख गाठी असून, गुजरातमध्ये कापसाचे उत्पादन ९६ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात ८५ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, ६ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
472
2