AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्ताप्रभात
कांदयावरील निर्यातबंदी हटण्याची शक्यता
कांदयाचे नवे उत्पादन आता बाजारात बऱ्याच प्रमाणात येऊ लागले आहे. त्यामुळे कांदयाचे दर उतरणीला लागलेले आहेत. परिणामी देशातील कांदा बाहेर जाऊ नये, म्हणून कांदयाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले की, नवा कांदा बाजारात येऊ लागल्यानंतर कांदयाच्या किमती वाढणार नाहीत. गेल्या महिन्यात कांदयाचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर हे भाव १६० रू. प्रति किलोपर्यंत गेले होते. ते कमी करण्यासाठी शासनाने कांदयाची निर्यात थांबविणे त्याचबरोबर कांदयाची आयात अशा दोन गोष्टींसाठी प्रयत्न केले होते. दरम्यानच्या काळात कांदयाचे दर ५० ते ६० रू. पर्यंत खाली आले आहेत. आयात केलेला कांदा बऱ्याच राज्यांनी नाकारला आहे. त्यामुळे देशांतर्गत कांदयाचा साठा व पुरवठा वाढला असल्याचे दिसून येते. त्यामुळे कांदयाचे दर आणखी कोसळू नये याकरिता काही प्रमाणात कांदयाची निर्यात होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे. संदर्भ – प्रभात, २६ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा
547
8