कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
यंदा ३६१ लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज
सीसीआय अनुसार चालू हंगामात उत्पादक बाजारपेठेत १६ एप्रिलपर्यंत २७८.८३ लाख गाठी कापसाची आवक झाली आहे, तर मागीलवर्षी या कालावधीपर्यंत २८६.३ लाख गाठीची आवक झाली होती. चालू हंगामात ३६१ लाख गाठी कापसाचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
चालू खरीप विपणन हंगाम २०१८-१९ मध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ने किमान आधारभूत मुल्य (एमएसपी) १०.७ लाख गाठी (एक गाठ-१७० किलो) कापूस खरेदी केली आहे. एकूण खरेदीमध्ये सर्वाधिक हिस्सा जवळपास ७० टक्के तेलंगाना व महाराष्ट्राचा आहे. सीसीआयच्या एक वरिष्ठ अधिकारीनुसार, उत्पादक बाजारपेठेत कापसाचे भाव यावेळी किमान आधारभूत मुल्यपेक्षा जास्त किंमतीत सुरू आहे. प्रमुख उत्पादक असलेल्या राज्यातील बाजारपेठेत जसे की, गुजरात ७२.५१ लाख गाठी, महाराष्ट्रात ६३.२७ लाख गाठी, तेलंगणा ३५.४६ लाख गाठी, राजस्थान २५.९२ लाख गाठी, हरियाणा २१.९५ लाख गाठी, मध्य प्रदेश २०.७५ लाख गाठी, आंध्र प्रदेश १०.२७ लाख गाठी, कर्नाटक ११.५६ लाख गाठींची आवक झाली आहे. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, २० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
23
0
संबंधित लेख