कृषि वार्ताद इकॉनॉमिक टाइम्स
शासन मधुमक्षिका पालनला देणार प्रोत्साहन
नवी दिल्ली: शासन ग्रामीण व आदिवासी भागात रोजगारचे प्रमाण वाढविण्यासाठी मधुमक्षिका पालनला प्रोत्साहन देणार आहे. लवकरच यासाठी एक नवीन धोरण तयार केले जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. गडकरी यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत आणि आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा याच्यासोबत झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा करण्यात आली. गडकरी यांनी ट्विट केले की, सर्व संबंधित विभागामध्ये लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये या एकत्रित धोरणांविषयी चर्चा करण्यात येणार आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग (केवीआईसी) यांनी मागील दोन वर्षापेक्षा ही कमी कालावधीत देशातील शेतकरी व बेरोजगार तरूणांना मधुमक्षिका पालनसाठी एक लाखपेक्षा ही अधिक पेटया दिले आहेत. आयोगाने हे ‘हनी मिशन’ अंतर्गत केले आहे. खादी ग्रामोदयोग विभागाने हनी मिशन सुरू केले आहे. यामुळे केवळ शेतकरी नाहीच, तर बेरोजगार तरूणपण हा व्यवसाय स्वीकारत आहेत. संदर्भ - इकॉनॉमिक टाइम्स, १२ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
49
0
संबंधित लेख