आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील तणांचे प्रभावी व्यवस्थापन
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तण ही एक मुख्य समस्या आहे. जे की, कपाशीची फायबर गुणवत्ता व उत्पादन कमी करतो, उत्पादन खर्च वाढवतो, सिंचन कार्यक्षमता कमी करून कीड व रोगच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतो. या कारणामुळे कापूस पिकातील तण व्यवस्थापन हे गरजेचे आहे.
कापुस पिकातील तण नियोजन करण्यासाठी खाली दिलेल्या उपायांचा वापर करता येईल. उगवणी पूर्वीचे तण :- बियाणांची लावणी / पेरणी / टोबणे झल्यानंतर आणि सिंचन करण्यापूर्वी पेंडामेथलिन (Pendamethalin) 38.7% @ 70 मिली / पंप सह 10 पंप दर एकर किंवा 700 मिली / एकर फ्लॅट पंख्याच्या नोजलच्या साह्याने मातीच्या पृष्ठभागावर उलट दिशेने फवारावे, जेणेकरून जमिनीत नव्याने उगवत्या तण / अंकुरांची झाडे नियंत्रित होतील. उगवणी नंतरचे तण :- उगवणी नंतरचे मोठी व अरुंद पाने असलेले तण नियंत्रित करावे. मोठी पाने असलेले (द्विदल ) तणासाठी : तणांच्या 2-3 पानांच्या टप्प्यावर पिरिथिओबॅक सोडियम 10% ईसी (Pyrithiobac Sodium 10% EC) @ 15-20 मिली / पंप ची फवारणी करावी आणि फवारणी करताना माती ओलसर असावी. अरुंद पाने असलेले / ग्रामिनी कुटुंबातील (एकदल ) तणासाठी : पिकाच्या स्थितीनुसार आणि तणांच्या वाढीनुसार प्रोपॅक्वीझाफोप 100 ईसी ( Propaquizafop 100 EC ) किंवा फेनोक्साप्रोप-पी-ईथाईल 9 ईसी (Fenoxaprop-p-ethyl 9 EC) किंवा क्वीझालफोप ईथाईल 5% ईसी (Quizolofop ethyl 5% EC) @ 25-40 मिली / पंप फवारावे. ही महत्वपूर्ण माहिती फेसबूक, व्हाॅटस अ‍ॅप व मॅसेज या माध्यमातून इतर शेतकरी मित्रांसोबत शेयर करण्यास विसरू नका.
298
0
संबंधित लेख