सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
पिकांमधील उंदराचे प्रभावी नियंत्रण
परिचय : भाजीपाला, तेलबिया, तृणधान्ये इत्यादी बऱ्याच पिकांमध्ये सुरवातीच्या टप्प्यावर उंदीर प्रादुर्भाव करून पीक दूषित करतात. ते मनुष्य आणि इतर प्राण्यांमध्ये सार्वजनिक आरोग्य रोग जसे की प्लेग, लेप्टोस्पायरोसिस इत्यादी प्रसारित करून, हानी पोहचवतात. पिकातील नुकसान आणि उपायाची माहिती खालील प्रमाणे दिली आहे. लक्षणे : उंदीर हे पिकांचे तसेच गोदामातील धान्यांचे देखील आतोनात नुकसान करतात. शेतातील बांधावर, पाण्याच्या पाटात व इतर ठिकाणी शेतात बिळे आढळल्यास पिकामध्ये उंदराचा प्रादुर्भाव आहे लक्षात येते. पिकांना मिळणारे पाणी बिळात झिरपून जमीन मशागतीचा खर्च वाढतो. बांधाची व पाटाची नेहमी दुरुस्ती करावी लागते. उंदराचा प्रादुर्भाव ऊस, गहू, हरभरा, हळद, आले, भात, भुईमूग इत्यादी पिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. नियंत्रण : कोणत्याही पिकामध्ये उंदराचा बंदोबस्त करण्यासाठी विषमुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी विघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम १०० ग्रॅम पिठामध्ये ५ ग्रॅम तेल व ५ ग्रॅम गुल मिसळून त्याच्या गोळ्या २ - ३ दिवस उंदराच्या येण्या - जाण्याच्या मार्गावर टाकाव्या त्यामुळे, त्यामुळे उंदरांना त्याची चटक लागते. त्यांनतर वरीलप्रमाणे गोळ्या कराव्यात त्यात ३ ग्रॅम झिंक फॉसस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पिठाच्या गोळ्या करून उंदराच्या येण्या - जाण्याच्या मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
128
2
संबंधित लेख