कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
शेतीसाठी भूजल स्तर सुधारणेवर जोर
आर्थिक आढावा २०१८-१९ मध्ये शेतीसाठी भूजल स्तरमध्ये सुधारणा देण्यावर जोर देण्यात आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय प्राथमिकता जमिनीची उत्पादकतापासून ते सिंचन जल उत्पादकता असा आहे. धोरणांमध्ये सुधारणा करत असताना, शेतकऱ्यांना संवेदनशील बनविले गेले पाहिजे आणि पाण्याच्या वापरामधील सुधारणा ही राष्ट्रीय प्राथमिकता असली पाहिजे.
आर्थिक आढावा २०१८-१९ मध्ये खाद्यान्न उत्पादन २८.३४ करोड टन राहण्याचा अंदाज आहे. केंद्रिय वित्त व कॉपोर्रेट मुद्दयांचे मंत्री निर्मला सीतारमण यांनी गुरूवारी संसदेत आर्थिक आढावा २०१८-१९ सादर करतेवेळी म्हणाले की, जलस्तरमध्ये सातत्याने होणारी घट ही शेतीसाठी धोकादायक आहे. त्याचबरोबर सिंचनासाठी ८९ टक्के भूजलचा वापर केला जातो. देशामध्ये भात व ऊस पिकासाठी उपलब्ध असलेल्या ६० टक्क्यापेक्षा ही जास्त पाण्याचा वापर सिंचनासाठी केला जातो. ज्यामुळे अन्य पिकांसाठी कमी पाणी शिल्लक राहते. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, ४ जुलै २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
47
0
संबंधित लेख