AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Feb 20, 01:00 PM
कृषी वार्ताकृषी जागरण
पीएम किसान योजनेचा अर्ज रिजेक्ट झाल्यास ‘या’ गोष्टी करा
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) अंतर्गत काही शेतकरी पात्र असूनदेखील त्यांचे अर्ज रिजेक्ट (बाद) झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण आता, नाव रिजेक्ट लिस्टमध्ये असेल, तर काय करावे याची माहिती खालीलप्रमाणे:
असे पाहा रिजेक्ट लिस्टमध्ये नाव पीएम किसान रिजेक्ट लिस्ट २०२० मध्ये आपले नाव पाहण्यासाठी जिल्हाच्या कृषी विभाग साइटवर जावा. 1. कृषी विभाग साइट उघडा. 2. यामध्ये Farmer Rejected List By PFMS असे लिहिलेले दिसेल. 3. मग, दोन पर्याय येतील, जिल्हयाचे नाव व ब्लॉकचे नाव 4. आपल्या जिल्हयाचे नाव निवडा, मग तहसीलचे नाव निवडा. 5. आता आपल्याला शेजारी Show बटण दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर सर्व माहिती मिळेल. 6. यानंतर आपले नाव, वडिलांचे नाव, गाव/ग्रामचे, मोबाईल नंबर, बँकेचा आयएफसी कोड, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड नंबर दिसेल 7. यासोबतच लिहिलेले पाहायला मिळेल की, आपल्याला रिजेक्ट लिस्टमध्ये का टाकले आहे. अर्ज रिजेक्ट होण्याचे कारण • नाव चुकीचे लिहीणे. • बँक खाते क्रमांक चुकीचे असणे किंवा अर्ज आधारशी लिंक नसेल. • बँक खाते आधारशी लिंक नसेल • राज्य सरकार द्वारा पेमेंट रोखला असेल • जोड बँक खाते असेल • बँक खाते बंद असेल • पीएम किसान पोर्टलवरून अर्ज न करणे प्रथम जाणून घ्या आपला अर्ज का रिजेक्ट झाला आहे. मग पुन्हा आपण त्या चुका ठीक करून दुबारा अर्ज करू शकता. या अर्जावर सही करण्यासाठी सीएससी सेंटरला जावे लागेल. यासाठी आपल्याकडे तीन कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 1. शेतकरी आधार 2. बँक पास बुक 3. जमिनीची कागदपत्रे संदर्भ – कृषी जागरण, 27 जानेवारी 2020 जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1000
63