कृषी वार्ताअॅग्रोवन
कृषी निर्यातीसाठी जिल्हानिहाय केंद्र
पुणे – देशाच्या कृषी निर्यातीचे मार्ग बळकट करण्यासाठी केंद्र सरकार नवे कृषी निर्यात धोरण तयार करीत आहेत. यात प्रत्येक राज्याला स्वत:चे धोरण तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रासह सात राज्यांनी आपले आराखडा तयार केले आहेत. नव्या धोरणानुसार प्रत्येक जिल्हयात ‘डिस्ट्रिक स्पेसिफिक अ‍ॅग्री एक्स्पोर्ट हब’ स्थापन होणार आहेत. _x000D_ नाबार्डचे माजी अध्यक्ष उमेशचंद्र सरंगी यांनी सांगितले की, “देशाची कृषी निर्यात ३० अब्ज डॉलर्सवरून २०३२ पर्यंत ६० अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय पातळीवर हालचाली केल्या जात आहेत. पंतप्रधान याच वर्षी कृषी निर्यातीच्या धोरणासंबंधी आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. _x000D_ संदर्भ - अ‍ॅग्रोवन, १४ जानेवारी २०२० _x000D_ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!_x000D_ _x000D_
805
0
संबंधित लेख