AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
23 Jul 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
गहूच्या किंमतीत वेगाने वाढ
गहूच्या मागणीत वाढ झाल्याने, किंमतीतदेखील वेगाने वाढ झाली आहे. मक्याच्या कमतरतेमुळे पोल्ट्री फीड उत्पादक गहूची खरेदी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर शासनाने खुल्या बाजार विक्री योजने (ओएमएसएस) च्या अंतर्गत गहूचे विक्री भाव ५५ रू. ची वाढ करण्यात आल्याने, आठवडयाभरात गहूच्या किंमतीत विक्री भाव जवळजवळ १०० ते १२५ रू. ची वेगाने वाढ झाली आहे. शासनाने ओएमएसएसच्या गहूचे विक्री भाव जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ५५ रू. ची वाढ करून २,१३५ रू. प्रति क्विंटल केले आहे. ज्यामुळे मक्क्याच्या किंमतीत वाढ होऊन उत्पादक बाजारपेठेत २,३०० ते २,३५० रू. प्रति क्विंटल झाले आहे. यामुळे पोल्ट्री फीड उत्पादक गहूचे खरेदी करत आहे. चालू खरीफ हंगामात दक्षिण भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कर्नाटक, महाराष्ट्र व तेलंगणामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. ज्यामुळे खरीप हंगामातील पेरणी मागे राहिली आहे. तसेच खरीप हंगामातील मक्काची आवक ही ऑक्टोबरच्या महिन्यानंतरही बाजारपेठेत उपलब्ध होईल. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, १९ जुलै २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
69
0