AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
29 Jun 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
भात व डाळवर्गीय पिकांची पेरणी मागे पडली
प्री-मान्सूनसोबत मान्सूनचा पाऊस कमी झाल्यामुळे खरीप पिकांची पेरणी मागे पडली आहे. कृषी मंत्रालयाच्या मते, खरीपची प्रमुख पिके भातसोबतच डाळवर्गीय, तेलवर्गीय आणि कापसाची पेरणी मागे पडली आहे. कृषी मंत्रालयाच्या अनुसार, चालू खरीपमध्ये आतापर्यंत ९०.६२ लाख हेक्टरमध्ये ही खरीप पिकांची पेरणी झाली आहे. जे की मागीलवर्षी या दरम्यान १०३.५५ लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. देशभरात आतापर्यंत मान्सून पाऊस सामान्यपणे ४२ टक्के कमी झाला आहे. खरीप प्रमुख पिकाच्या पिकांची पेरणी चालू खरीपमध्ये आतापर्यंत केवळ ६.३० लाख हेक्टरमध्ये ही झाले आहे, जे की मागील वर्षी या वेळेपर्यंत ९.२४ लाख हेक्टरमध्ये झाली होती. डाळवर्गीय पिकांची पेरणी चालू खरीपमध्ये आतापर्यंत केवळ १.७० लाख हेक्टरमध्ये झाली आहे. जे की मागील वर्षी या दरम्यान ३.३८ लाख हेक्टरमध्ये खरीप डाळींची पेरणी झाली होती. संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २१ जून २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
29
0