AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Sep 19, 01:00 PM
कृषि वार्ताअॅग्रोवन
देशात तिळाच्या पेरणी क्षेत्रात घट
मुंबई – खरिपात तीळ पिकाचे क्षेत्र वार्षिक 6.1 टक्क्यांनी कमी होऊन 1.27 दशलक्ष हेक्टर झाले असल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीत नमूद केले आहे. मागील आठवडयात पेरणीचे अंतर 5.4 टक्क्यांनी वाढली आहे. दुसरे मोठे उत्पादक असलेले राज्य मध्य प्रदेशमध्ये पेरणी 29.5 टक्क्यांनी मागे पडली असून, त्या ठिकाणी 3,11,000 हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्याचबरोबर प्रमुख उत्पादक असलेले राज्य राजस्थानमध्ये तिळाखालील क्षेत्र 0.9 टक्क्यांची वाढ होऊन 2.88,700 हेक्टर झाले होते. सर्वाधिक उत्पन्न असलेल्या उत्तर प्रदेश या राज्यात पेरणी क्षेत्रात वार्षिक 25.8 टक्क्यांनी वाढ होऊन 4,17,435 हेक्टर क्षेत्र होते. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्रात एकून घसरण रोखली आहे. संदर्भ – अॅग्रोवन, 5 सप्टेंबर 2019
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
0