AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 01:00 PM
कृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
कांदयाच्या किंमतीमध्ये प्रति क्विंटल ३ हजार रू. ची घट
नवी दिल्ली: कांदयाच्या किंमती कमी होऊ लागले आहेत. दिल्लीच्या आझादपूर बाजारपेठेत कांदयाच्या किंमती २,५०० ते ३,००० रू. प्रति क्विंटलपर्यंत कमी होऊन ते २,५०० ते ६,००० क्विंटल झाले आहे. महाराष्ट्रासह गुजरातच्या बाजारपेठेत कांदयाच्या उशिरा झालेल्या खरीप पिकाची आवक वाढली असल्याने त्याच्या किंमती आणखी कमी होण्याचा अंदाज आहे.
कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले की, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उशिरा खरीप झालेल्या कांदयाची आवक वाढल्याने किंमतीमध्ये मागील १० दिवसात जवळजवळ २,५०० ते ३,००० रू. प्रति क्विंटलची घट झाली. त्यांनी सांगितले की, पुढे कांदयाची आवक आणखी वाढेल त्यामुळे कांदयाच्या किंमतीत घट होईल. बागायती संशोधन व विकास प्रतिष्ठान (एनएचआरडीएफ) च्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील लासलगाव बाजारपेठेत चांगल्या कांदयाच्या किंमती 3 जानेवारीला ४७.९० रू. प्रति किलो होते, जे की दैनिक आवक २०,२९४ क्विंटल झाली. २४ डिसेंबरला बाजारपेठेत कांदयाचे भाव ८३.०१ रू. प्रति किलो होते, जे की दैनिक आवाक केवळ १२,२७० क्विंटल होती. संदर्भ – आउटलुक अ‍ॅग्रीकल्चर, ४ जानेवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
175
1